डॉक्टरांची कमतरता भासत असल्याने बीडीएस अर्हताधारक डॉक्टर्स घेण्याचे महापौरांचे निर्देश

ठाणे महापालिकेनं पदभरतीच्या काढलेल्या जाहिरातीत बीडीएस अर्हताधारक डॉक्टरांचाही उल्लेख करावा असे निर्देश महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत. महापालिकेनं डॉक्टर आणि इतर पदांसाठी दिलेल्या जाहिरातीत एमबीबीएस डॉक्टरांचाच उल्लेख केला आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिकेला डॉक्टरांची कमतरता भासत आहे. क्वारंटाईन सेंटर, हॉटस्पॉट अशा ठिकाणी डॉक्टरांचीच गरज असते. मात्र सद्यस्थितीत डॉक्टर्स मिळत नसल्यानं बीडीएस अर्हताधारक डॉक्टर्स घ्यावेत असं शासन निर्णयात नमूद केलं आहे. त्यामुळे डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन बीडीएस अर्हताधारक डॉक्टर्स महापालिकेनं घेतले तर त्याचा निश्चित फायदा होईल असं महापौरांनी पत्रात म्हटलं असून पुढील जाहिरातीत बीडीएस अर्हताधारक डॉक्टरांचा उल्लेख करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading