मोबाईल चोरून नेणा-या आरोपीस अटक करून त्याच्याकडून २५ मोबाईल हस्तगत करण्यात कासारवडवली पोलीसांना यश

रात्रीच्या वेळी दुकानाचा पत्रा तोडून मोबाईल चोरून नेणा-या आरोपीस अटक करून त्याच्याकडून २५ मोबाईल हस्तगत करण्यात कासारवडवली पोलीसांना यश आलं आहे. कासारवडवली मधील वेलकम मोबाईल शॉपचं दुकान २५ डिसेंबरच्या रात्री फोडण्यात आलं आणि चोरट्यानं या दुकानातील मोबाईल लंपास केले होते. याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेनं आरोपींचा शोध घेतला. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीसांनी यश गायकवाडला अटक केली आणि त्याच्याकडून ७६ हजारांचे २४ मोबाईल फोन हस्तगत केले. यश गायकवाडला ४ जानेवारीपर्यंत न्यायालयानं पोलीस कोठडी दिली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading