मोबाईल आणि रोख रक्कम चोरणा-या तिघांना अटक

वागळे इस्टेटमधील सी पी तलाव येथील मोबाईलच्या दुकानाचे शटर तोडून मोबाईल चोरणाऱ्या आणी मेडिकलच्या दुकानाचे शटर तोडून रोख रक्कम चोरून नेणाऱ्या तीन आरोपींना श्रीनगर पोलिसांनी मोठ्या शीताफीने अटक केली आहे. सुनील निशाद याचं वागळे इस्टेट येथे मोबाईलचे दुकान आहे. 29 तारखेला रात्री 10 च्या दरम्यान दुकानाचे शटर तोडून रिपेरिंग करिता आलेले 17 मोबाईल आणी दोन डिस्प्ले असा एकूण १ लाखांचा ऐवज चोरून नेला होता. सचिन सूर्यवंशी यांचे वागळे इस्टेट येथे धन्वंतरी मेडिकल नावाचे दुकान आहे, त्याचे शटर तोडून २ हजार रुपये चोरून नेले होते. याप्रकरणी आलेल्या तक्रारीवर पोलीसांनी तपासास सुरुवात केली, तपासात मिळालेल्या माहिती नुसार आणी तांत्रिक साधनांचा वापर करून पवन राम, आणि संदीप अठवाल यांना रामनगर येथून तर विजय डिंग याला भांडुप टॅंक रोड येथून ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 17 मोबाईल आणी रोख रक्कम २ हजार रुपये असा १ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी भांडुप येथे अशा स्वरूपाचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. कमी कालावधी मध्ये घरफोडी सारख्या गुन्ह्यांची उकल केल्यामुळे विभागातील व्यापारी तसेच नागरिकांनी या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading