दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही रंगीत तालिम

दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही पोलीसांच्या तयारीची पाहणी करण्यासाठी महापालिका मुख्यालयाजवळ रंगीत तालिम करण्यात आली. या रंगीत तालमीत शीघ्र कृती दलाच्या जवानांना दोन कथित दहशतवाद्यांना शोधण्यात यश आलं. दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात अशी एखादी घटना घडल्यास आपली तयारी कशी आहे याची चाचणी घेण्यासाठी ही रंगीत तालिम करण्यात आली. या रंगीत तालमीत पोलीसांसह आरोग्य विभाग, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधनाशक पथक कसा प्रतिसाद देतात, त्यांची तयारी किती आहे याची तपासणी या रंगीत तालमीतून करण्यात आली. पोलीस नियंत्रण कक्षातून शीघ्र कृती दलासह सर्व यंत्रणांना महापालिका मुख्यालयात दोन दहशतवादी शिरल्याचं कळवण्यात आलं. त्यानंतर बॉम्ब शोध नाशक पथकानं महापालिकेचा ताबा घेतला आणि या ठिकाणी जवळपास दोन तास शोध मोहिम चालली. तोपर्यंत रूग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहनं, पोलीसांची वाहनं महापालिकेसमोर जमा झाली. त्यामुळं या परिसरात एकच घबराट निर्माण झाली होती. दोन तासाच्या शोध मोहिमेनंतर पोलीसांनी दोन दहशतवाद्यांना पकडल्याचं घोषित करत ही शोध मोहिम यशस्वी झाल्याचं जाहीर केलं. त्यानंतर ही एक रंगीत तालिम असल्याचं पोलीसांकडून सांगण्यात आल्यामुळं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading