डोंबिवलीत दीड वर्षात ९३ अल्पवयीन मुली बेपत्ता – ८४ अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश

डोंबिवलीत गेल्या दीड वर्षात 148 मुले गायब असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून यात 93 अल्पवयीन मुली आणि ५५ मुलांचा समावेश आहे. यापैकी डोंबिवली पोलिसांना ८४ अल्पवयीन मुली आणि ५४ मुलांना शोधून काढण्यात यश आले आहे तर ९ अल्पवयीन मुली आणि १ मुलगा अजूनही गायब असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. कौटुंबिक वाद, नैराश्य, अल्पवयीन भूलथापा तसेच लग्नाचे प्रलोभन, प्रेम प्रकरण यामुळे अल्पवयीन मुलं-मुली घरातून निघून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून अल्पवयीन मुलगी पळून जाताना मागे कोणताही पुरावा ठेवत नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आलं आहे. पालकांनी अल्पवयीन मुलं किंवा मुलींबरोबर मैत्रीच्या नात्याने राहून शाळेत किंवा कॉलेजमध्ये ती काय करते आणि तिचे विचार काय आहेत याबाबत लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगून आपल्या मुलांची आपण काळजी घ्यावी असे आवाहन डोंबिवली पोलीसांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading