मोटर सायकलची चोरी करून त्यांची भंगारमध्ये विल्हेवाट लावणा-या त्रिकुटाला अटक

ठाणे-मुंबई परिसरात मोटर सायकलची चोरी करून त्यांची भंगारमध्ये विल्हेवाट लावणा-या त्रिकुटाला मुंब्रा पोलीसांनी अटक करून त्यांच्याकडून १२ मोटार सायकली जप्त केल्या आहेत. मुंब्रा पोलीसांना एक व्यक्ती चोरीला गेलेली बर्गमॅन मोटर सायकल विक्री करण्यासाठी मुंब्रा बायपास येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलीसांनी बर्गमॅन मोटर सायकल विक्रीसाठी आलेल्या रकिब खान या भंगार खरेदी विक्री करणा-यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने रविंद्र सरोज या भंगार विक्री करणा-या व्यक्तीच्या सांगण्यावरून त्याचा साथीदार नादीर अन्सारी बरोबर ही मोटर सायकल रविंद्र सरोज याला विकणार असल्याचं सांगितलं. त्यानुसार पोलीसांनी भंगारवाला रविंद्र लालजी आणि नादीर अन्सारी यांचा कसोशीने तपास केला. त्यावेळी एकूण ५ गुन्ह्यातील १२ मोटर सायकली पोलीसांनी हस्तगत केल्या असून या तिघांना अटक केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading