मोक्ष म्हणजे मेल्यानंतर मिळणारी कुठली जागा नसून अज्ञानाच्या अंधारातून मुक्त होणे म्हणजे मोक्ष होय – बेल्जियन संशोधक कॉनराड एल्स्ट

प्राच्यविद्या अभ्यास संस्था आणि जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या वतीने वतीने ज्येष्ठ बेल्जियन संशोधक आणि लेखक कॉनराड एल्स्ट यांचे विशेष व्याख्यान पाणीनि सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेले होते. डॉ कॉनराड एल्स्ट हे विख्यात संशोधक, लेखक, प्राच्यविद्येचे अभ्यासक असून सध्या भारत दौऱ्यावर आहेत. धर्म आणि मोक्ष मानवी जीवनाचे ध्येय या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. ठाण्याच्या सांस्कृतिक अवकाशात मुलाची भर घालणारे सुसज्ज संदर्भ ग्रंथालय आणि वस्तुसंग्रहालय ही संस्था चालवते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ कॉनराड एल्स्ट यांनी धर्म आणि मोक्ष या संकल्पनांची सविस्तर भाष्य केले. भारतीय संस्कृतीच्या प्रवाही परंपरेमध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचे महत्त्व आहे. धर्म हा विषय प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग केला जातो वास्तविक रिलीजन हे काही धर्म शब्दाचे योग्य भाषांतर नाही धर्म हा शब्द कर्तव्य या अर्थाने भारतीय वापरतात मात्र पाश्चात्य पाश्चात्य संस्कृतीमध्ये धर्म हा नैतिकता या अर्थाने वापरला जातो आणि चीनमध्ये तर कायदा या अर्थाने वापरला जातो धर्म आणि मोक्ष या संकल्पनांचे इस्लाम ख्रिश्चनिटी बौद्ध तत्त्वज्ञान आणि भारतीय परिप्रेक्षात तुलनात्मक विश्लेषण यावेळी डॉ कॉनराड एल्स्ट यांनी केले. मोक्ष म्हणजे मेल्यानंतर मिळणारी कुठली जागा नसून अज्ञानाच्या अंधारातून मुक्त होणे म्हणजे मोक्ष होय भारतीय तत्त्वज्ञानाचे जागतिक परिप्रेक्ष्यामध्ये असलेले महत्त्व डॉ कॉनराड एल्स्ट यांनी
अधोरेखित केले. कॉनराड एल्स्ट यांच्या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले प्रश्नोत्तराचा तास रंगला.
या व्याख्यानानंतर डॉ कॉनराड एल्स्ट यांनी प्राच्यविद्या अभ्यास संस्थेला भेट दिली आणि तेथील संदर्भ ग्रंथालय आणि वस्तुसंग्रहालयाचे काम समजून घेतले तेथे उपलब्ध असलेल्या अनेक दुर्मिळ हस्तलिखितांच्या प्रति त्यांनी साकल्याने हाताळल्या आणि संस्थेच्या कामाचे कौतुक केले. या प्रसंगी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ विजय बेडेकर आणि मंडळाचे विश्वस्त डॉ महेश बेडेकर उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading