ठाणे महापालिकेच्या सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित केलेल्या प्रतिरुप मुलाखती

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींकरिता ठाणे महापालिकेच्या सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित केलेल्या प्रतिरुप मुलाखती यशस्वीरीत्या पार पडल्या. मुलाखत देताना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना कशा पध्दतीत बदल केला पाहिजे? देहबोली कशा पध्दतीने हवी, आयकॉन्टेक्ट कसा असला पाहिजे, तसेच डीएएफ फॉर्मवर कशा पध्दतीने यूपीएससी समिती कसे प्रश्न विचारु शकतात या आणि इतर अनेक बाबींबाबत सखोल असे बहुमूल्य मार्गदर्शन तज्ज्ञांनी केले. स्वतंत्र भारताच्या पहिल्या नोटेवर सही असणारे चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांच्या 127 व्या जयंतीचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार या मॉक इंटरव्हिवचे आयोजन करण्यात आले होते. या मुलाखतीच्या सत्रात पॅनलमध्ये सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी, मुंबई रेल्वेचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, Mumbai NIA चे SP डॉ. शैलेंद्र मिश्रा, संदिप कदम, माहिती जनसंपर्क संचालनालयाचे संचालक राहूल तिडके, राजलक्ष्मी कदम (IRS), यूपीएससी आणि एमपीएससी अभ्यासक्रमाचे तज्ज्ञ मार्गदर्शक भुषण देशमुख आदी मान्यवरांनी UPSC मुख्य परीक्षेत उत्तीण झालेल्या परीक्षार्थीच्या मॉक इंटरव्हिव्यू घेतल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading