मेट्रोच्या कामामुळे 23 ते 26 मार्च दरम्यान कासारवडवली सिग्नलजवळील वाहतुकीत बदल

ठाणे शहरातील कासारवडवली सिग्नल ते घोडबंदर रोड या परिसरात मुंबई मेट्रो लाईन-४ प्रकल्पाअंतर्गत कासारवडवली सिग्नलजवळ मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे 23 मार्च 2023 ते 26 मार्च 2023 पर्यंत रात्रौ 23.55 वा. ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत या मार्गावरील ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी वाहिनी जड अवजड वाहनांकरीता वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपाआयुक्त (वाहतूक) डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे.

वाहतुकीत बदल पुढील प्रमाणे-

        प्रवेश बंद – 1) मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

        पर्यायी मार्ग – अ) मुंबई, ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

ब) मुंबई, ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे

वळण घेवून कशेळी, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

        प्रवेश बंद – 2) मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

        पर्यायी मार्ग – मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने ही गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

        प्रवेश बंद – 3) नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

        पर्यायी मार्ग – नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अंजूर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

        जड अवजड वाहने सोडून इतर वाहने आनंदनगर सिग्नल सर्व्हिस रोड मार्गे ओवळा सिग्नल येथून मुख्य रस्त्यास मिळून पुढे इच्छित स्थळी जातील.

1) दि. 23 मार्च २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. 24 मार्च २०२३ रोजी सकाळी ०5.०० वाजेपर्यंत

2) दि. 24 मार्च २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. 25 मार्च २०२३ रोजी सकाळी ०5.०० वाजेपर्यंत

3) दि. 25 मार्च २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. 26 मार्च २०२३ रोजी सकाळी ०5.०० वाजेपर्यंत

        ही वाहतूक अधिसूचना वर नमूद कालावधी दरम्यान गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडॉर, ऑक्सिजन गॅस वाहतूक करणारी वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे उपाआयुक्त डॉ. परोपकारी यांनी कळविले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading