आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वारकरी संप्रदायातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा गौरव

आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या चैत्रनवरात्रोत्सव २०२३ भक्ती आणि कला महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी वारकरी संप्रदायातील किर्तनकार ह. भ. प निवृत्ती इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन सादर करण्यात आले. तसेच या कार्यक्रमामध्ये ठाणे, नवी मुंबई, मीराभाईंदर मधील वारकरी संप्रदायातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा गौरव करून सन्मानित करण्यात आले. ठाण्यातील ह. भ. प. महादेव पार्टे महाराज, ह. भ. प.गोविंद गोळे महाराज, ह. भ. प.जालिंदर वसंत फटांगरे, ह. भ. प.बाळासाहेब डुंबरे, ह. भ. प. वृंदा दाभोळकर, ह. भ. प. मेघाताई आडके, आदि मान्यवरांचा किर्तनकार ह. भ. प निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading