मुलीच्या नावात झालेला बदल सुधारण्यासाठी २ हजारांची लाच घेणा-या शिपायाला रंगेहात अटक

मुलीच्या नावात झालेला बदल सुधारण्यासाठी २ हजारांची लाच घेणा-या ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिपायाला रंगेहात अटक करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र मोरे या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात अटक केली. शाळेतील विद्यार्थिनीच्या नावात बदल झाला होता. तो सुधारण्यासाठी जितेंद्र मोरे याने या मुलीच्या पालकांकडे ५ हजारांची मागणी केली होती. मुलीच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर मोरे याला २ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading