आमदार निरंजन डावखरेंकडून बोरघाटातील अपघातामुळे कार्यक्रम रद्द – वाढदिवसाच्या आनंदोत्सवाऐवजी मृतांना श्रद्धांजली

बोरघाटातील भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी वाढदिवसानिमित्त आनंदोत्सवाचे कार्यक्रम रद्द करुन अपघातातील १३ मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. तसेच जखमींची प्रकृती लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना केली.
आमदार निरंजन डावखरे यांचा वाढदिवस दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. त्यानुसार शहरातील विविध भागात आनंदोत्सवासह नागरिकांना सेवा देण्याचे कार्यक्रम आयोजित केले होते. परंतु, बोरघाटात झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाचा मुख्य कार्यक्रम रद्द करण्यात आला. निरंजन डावखरे यांनी भेटवस्तू वा पुष्पगुच्छ स्वीकारले नाहीत. तर मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.  ठाण्यातील नागरिकांच्या सेवेसाठी आयोजित केलेले कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने पूर्ण करण्यात आले. `आई प्रतिष्ठान’तर्फे भाजपाच्या स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी सुरू केलेल्या स्व. वसंतराव डावखरे साहेब रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचे निरंजन डावखरे यांनी लोकार्पण केले.  या केंद्राच्या माध्यमातून कोपरीबरोबरच ठाणेकरांना रुग्ण साहित्य उपलब्ध होणार आहे. तसेच वह्यावाटपाच्या जाहीर कार्यक्रमाऐवजी थेट विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या. `रुद्र प्रतिष्ठान’तर्फे आमदार निरंजन डावखरे आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्ताने येऊर येथे गोशाळेत सेवा, गरजू आदिवासी कुटुंबांना धान्यवाटप करण्यात आले. महेश कदम यांच्या स्वामी प्रतिष्ठानतर्फे कर्करोगग्रस्त रुग्णाला २० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading