मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काढलेल्या उद्गाराच्या निषेधार्थ खासदार अरविंद सावंत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काढलेल्या उद्गाराच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी खासदार अरविंद सावंत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी केली.
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी संभाजी नगर येथे महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिक्षावाला उल्लेख करत महाविकास आघाडीचे नेते रिक्षावाल्यांच्या हाताखाली काम करणार का? असं बेताल वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक आक्रमक झाले असून ठाण्यातील नगरसेवक एकनाथ भोईर आणि रिक्षाचालक तसंच  शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. यावेळी खासदार अरविंद सांवत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी करण्यात आली. अरविंद सावंत यांनी रिक्षावाल्यांच्या हाताखाली काम करायचं का? या विधाना बद्दल, निषेध व्यक्त करत राजेश मोरे आणि एकनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली रिक्षावाल्यांनी ठाणे महापालिका ते गावदेवी मैदान अशी रिक्षा रॅली काढली होती. महिला रिक्षाचालक सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. यावेळी अरविंद सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading