मुंब्र्यातून अटक करण्यात आलेल्या 25 बांग्लादेशी आणि मलेशियन नागरिकांची जामिनावर मुक्तता

मुंब्र्यातून अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशी आणि मलेशियन नागरिकांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. दिल्लीच्या निजामुद्दीन तबलिगी मेळाव्यात सहभागी झालेल्या 13 बांगलादेशी आणि आठ मलेशियन नागरिकांसह 25 जणांना पर्यटन व्हिसाच्या अटी-शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने अटक केली होती. निजामुद्दीन येथील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्याचा शोध घेण्याचे आदेश सरकारने दिले होते त्यानुसार मुंब्रा पोलिसांनी केलेल्या कारवाईत 13 बांगलादेशी आणि 8 मलेशियनसह 4 भारतीय अशा एकुण 25 नागरिकांना ताब्यात घेतले होते. महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने या सर्वजणांची तातडीने तपासणी करून कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने सर्वाना शिळ-डायघर येथील दोस्ती गृहसंकुलात 14 दिवस होम क्वारंटाईन केले होते. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपताच गुन्हे शाखेने अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावुन सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. देशात लॉकडाऊन असल्याने हे सर्वजण पुन्हा ट्रस्टच्या आसऱ्याला गेले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading