ठाणे महापालिका क्षेत्रात काल दिवसभरात ११ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

ठाणे महापालिका क्षेत्रात काल दिवसभरात ११ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये ७ पुरूष तर ४ महिलांचा समावेश आहे. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १७८ वर पोहचली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातून आत्तापर्यंत २८ जण कोरोनामुक्त होऊन घरे परतले आहेत. नागरिकांनी स्वत:ची काळजी घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पालिकेनं केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading