ठाणे पोलीस आयुक्तालयातील 1463 गृहसंकुलांना पोलीसांकडून नोटीसा

ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी – कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नये यासाठी पोलीस आयुक्तालयातील 1463 गृहसंकुलांना नोटीस बजावण्यात आली आहे. कोरोनाच्या लढयात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या प्रामुख्याने डॉक्टर्स,नर्स, वैदयकिय क्षेत्राशी निगडीत व्यक्ती, सफाई कर्मचारी,पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांना ते राहत असलेल्या सोसायटीतील रहिवासी- पदाधिकाऱ्यांकडुन मानसिक आणि शारीरीक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. तेव्हा अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. त्यानुसार 1463 गृहसंकुलांना या संदर्भात पत्रव्यवहार करून इशारा दिल्याची माहिती पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading