मुंब्रा येथे १ हजार खाटांचे कोविड हॉस्पिटल म्हाडा उभारणार

मुंब्रा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियममध्ये म्हाडाच्या वतीने १००० बेडसचे कोव्हीड हॅास्पीटल उभे करण्यात येणार असून आज पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी जागेची पाहणी केली. भविष्यात कोव्हीड १९ रूग्णांना बेडस् उपलब्ध व्हावेत यासाठी शहरामध्ये ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून १००० बेडसचे कोव्हीड रूग्णालय उभारण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली असून लवकरच ते रूग्णालय कार्यान्वित होणार आहे. परंतु भविष्यातील गरज लक्षात घेवून मुंब्रा प्रभाग समितीतंर्गत पालिकेच्या कौसा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियममध्ये म्हाडाच्या वतीने १००० बेडसचे कोव्हीड रूग्णालय उभे करण्यात येत आहे. यामध्ये ॲाक्सीजनची सुविधा असलेले ५०० बेडस् निर्माण करण्यात येणार आहेत तर १०० बेडसचे आयसीयू युनिट तयार करण्यात येणार आहेत. या रूग्णालयाची उभारणी कशा पद्धतीने होईल याची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी मुंब्रा परिसरात निर्माण होणाऱ्या कोव्हीड रूग्णालयामुळे या परिसरातील रूग्णांची मोठी सोय होणार असल्याचे सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading