ठाणे पोलीस आयुक्तालयातील ९ पोलीसांची कोरोनावर मात – आज घरी परतले

ठाणे पोलीस आयुक्तालयातील ९ पोलीस कर्मचा-यांनी आज कोरोनावर यशस्वीरित्या मात करून ते रूग्णालयातून घरी परतले आहेत. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून संचारबंदीचं पालन योग्यरितीने व्हावं यासाठी पोलीसांवर मोठी जबाबदारी आहे. पोलीसांचा जनतेशी थेट संपर्क येत असल्यानं पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. आजच्या दिवसात सफायर हॉस्पिटलमधून ६, आणि वेदांत, काळसेकर, सेव्हन हिल हॉस्पिटलमधून प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयातील १५ अधिकारी तसंच १२१ कर्मचारी कोरोनाने बाधित झाले होते. त्यांना उपचारासाठी विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी आजपर्यंत १० पोलीस अधिकारी आणि ७० पोलीस कर्मचा-यांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून ते घरी गेले आहेत. तसंच एका महिला पोलीस कर्मचा-यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सद्यस्थितीत ५ पोलीस अधिकारी आणि ५ पोलीस कर्मचारी उपचार घेत आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून लवकरच बरे होऊन ते कर्तव्यावर रूजू होतील.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading