मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर डोंगरावरील दगड चाळीतील घरांवर पडल्याने एका महिलेचा मृत्यू

मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर डोंगरावरील दगड चाळीतील घरांवर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावरील गावदेवी येथे बाजूच्या डोंगरावरील ४ बाय ३ फूटाचा दगड जवळच असलेल्या चाळीतील दोन घरांवर कोसळला. डोंगरावरील दगड उंचावरून खाली असलेल्या साईकृपा चाळीतील सुनिल वानपसारे यांच्या आणि गजराज सोसायटी या चाळीतील मारुती सुर्यवंशी यांच्या घरावर कोसळल्याने दोन्हीही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसंच यामध्यये कविता वानपसरे या महिलेचा मृत्यू झाला. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मुंब्रा प्रभाग समितीचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रतिसादक, वनविभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केलं. या ठिकाणी डोंगरावरील आणखी काही दगड कोसळण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने वस्तीमधील एकूण १४ सदनिका रिकाम्या करून रहिवाश्यांची राहण्याची व्यवस्था महापालिका शाळेमध्ये करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading