जिल्ह्यात कोरोनाचे १७० नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे १७० नवे रूग्ण आढळले. तर एकाचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात २ हजार २२२ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ९४६ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ५४ रूग्ण आढळले. सध्या ८४९ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १५४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये २१ रूग्ण आढळले. सध्या २०४ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९६० रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ६९ नवे रूग्ण आढळले. सध्या ८४१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ५४ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ८ रूग्ण आढळले. तर एकाचा मृत्यू झाला. सध्या ९५ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ४०४ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ८ रूग्ण तर सध्या १०९ रूग्ण उपचारार्थ दाखल आहे. आत्तापर्यंत ६६३ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज १ रूग्ण, सध्या १९ रूग्ण उपचार घेत आहे. तर आत्तापर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज २ रूग्ण तर ४१ रूग्ण उपचार असून आत्तापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये ७ रूग्ण आढळले. सध्या ६४ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २५७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading