आंबेघोसाळे तलाव येथील कृत्रिम तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या ७ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

आंबेघोसाळे तलाव येथील कृत्रिम तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या ७ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. जैहद शेख हा राबोडीत राहणारा मुलगा आज रात्री ८ च्या सुमारास कृत्रिम तलावात पोहण्यासाठी उतरला असता, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. घटनास्थळी राबोडी पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.या मुलाचा मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading