मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर कंटेनर उलटा झाल्यामुळं शहरात सकाळी वाहतूक कोंडी

मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर काल रात्री एक मोठा कंटेनर उलटा झाल्यामुळे ठाण्यामध्ये आज सकाळपर्यंत बहुतांश सर्व महामार्गांवर वाहतुकीची कोंडी झाल्याचं जाणवत होतं. काल रात्री मुंब्रा बायपास रस्त्यावर झालेल्या अपघातात एक कंटेनर उलटा झाला होता. यामुळं नाशिकहून मुंबईकडे, घोडबंदरहून ठाण्याकडे तसंच मुंबईहून नाशिककडे आणि घोडबंदर रस्ता अशा बहुतांश सर्व मार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती. या सर्व महामार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसत होतं. ही वाहतूक कोंडी इतकी मोठी होती की दुचाकी वाहनांनाही वाट काढता येत नव्हती. सुरूवातीला वाहतूक शाखेनं वाहतूक मोकळी करण्यावर भर दिला. नंतर हा कंटेनर महामार्गातून रस्त्याच्या कडेला नेण्यात आला त्यानंतरच या सर्व महामार्गांवरील वाहतूक सुमारे ११ च्या सुमारास सुरळीत होऊ शकली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading