ठाण्यामध्ये एका रिक्षावर झाड पडून दुस-याच रिक्षाचा चालक जखमी

ठाण्यामध्ये एका रिक्षावर झाड पडून दुस-याच रिक्षाचा चालक जखमी झाला आहे. आज दुपारी दमाणी इस्टेट येथे ही घटना घडली. यामध्ये रिक्षाचे नुकसान झाले असून रस्त्याच्या कडेला उभा असलेला जयराम यादव हा दुसऱ्याच रिक्षाचा चालक जखमी झाला आहे. दमाणी इस्टेट परिसरातील दत्तमंदिर येथे रिक्षा रांगेत उभ्या होत्या. दुपारच्या सुमारास रस्त्यालगत असलेले सुकलेले झाड अचानक या रिक्षांवर पडले. हे झाड राजेंद्र तिवारी यांच्या रिक्षावर पडल्याने त्यांच्या रिक्षाचे नुकसान झाले आहे. त्यावेळी रिक्षा सोडून उभा असलेला नवी मुंबईतील रिक्षाचालक जयराम यादव यामध्ये जखमी झाला. त्याच्या हाता-पायाला दुखापत झाल्याने त्याला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. या घटनेची माहिती कळताच ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केलं अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading