मुंब्रा बायपास रोड जवळ रेतीबंदर खाडीत पडलेल्या एका महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश

मुंब्रा बायपास रोड जवळ रेतीबंदर खाडीत पडलेल्या एका महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. ज्योती उपाध्याय या काल्हेर येथे राहणा-या महिलेने आज पहाटे ५च्या सुमारास कशेळी खाडीमध्ये उडी मारली होती. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे आलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांनी घटनास्थळी जाऊन या महिलेला रेतीबंदर खाडीतून सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर या महिलेला मुंब्रा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading