मुंब्रा पोलीसांना हरवलेल्या महिलेचा तसंच तिच्या दागिन्यांचा शोध घेण्यात यश

मुंब्रा पोलीसांना हरवलेल्या महिलेचा तसंच तिच्या दागिन्यांचा शोध घेण्यात यश आलं आहे. जहीर शेख यांची पत्नी आयेशीबी शेख या कोणाला काही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घरातून १९५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेही बरोबर नेल्याची माहिती त्यांचे पती जहीर शेख यांनी पोलीसांना दिली होती. आयेशीबी शेख यांची मानसिक स्थितीही स्थिर नसल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं. मिळालेल्या माहितीवरून पोलीसांनी शोध घेतला असता ही महिला उथळसर येथे तिच्या नातेवाईकांच्या घरी पोलीसांना मिळाली. परंतु तिच्याकडे असलेली सोन्याच्या दागिन्यांची पिशवी गहाळ झाली होती. तिची मानसिक स्थिती स्थिर नसल्याने तिला त्याबद्दल काहीही सांगता येत नव्हते. पोलीसांनी सीसीटीव्ही तपासणी केली असता ही महिला ऋतू पार्क येथील शितल डेअरी जवळ बसून होती हे समजलं. परंतु तिच्या हातात पिशवी दिसत नव्हती. सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेत एका व्यक्तीला ही पिशी मिळाली होती हे दिसून आलं. त्यानुसार पोलीसांनी या व्यक्तीकडून ११ लाख ७० हजारांचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी प्राप्त केली आणि जहीर शेख यांच्या ताब्यात देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading