मुंबई महापालिकेच्या गाडीची डिझेल टाकी फुटल्यामुळे सकाळच्या सुमारास पूर्व द्रूतगती महामार्गावर वाहनांची कोंडी

मुंबई महापालिकेच्या गाडीची डिझेल टाकी फुटल्यामुळे सकाळच्या सुमारास पूर्व द्रूतगती महामार्गावर वाहनांची कोंडी झाली होती. सकाळी पावणेआठच्या सुमारास पूर्व द्रूतगती महामार्गावर मुंबईकडे जाणा-या बाजूस हा प्रकार घडला. मुंबई महापालिकेच्या बिघाड दुरूस्ती वाहनाची डिझेल टाकी फुटल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर डिझेल पडले होते. त्याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसंच अग्निशमन दलानं त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर पडलेले डिझेल पाणी मारून दूर करण्यात आलं. त्यानंतर त्यावर माती टाकून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला पण तोपर्यंत या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading