मावळी मंडळ कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात शिवतेज क्रीडा मंडळ तर पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर अंतिम विजेतेपद

मावळी मंडळ आयोजित 98 व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त 70 व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात शिवतेज क्रीडा मंडळ ठाणे या संघाने अंतिम विजेतेपद मिळवले. तर,  पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगरअंतिम विजेतेपद पटकावले.
महिला गटात ठाण्याच्या  शिवतेज क्रीडा मंडळ या संघाने धुळ्याच्या शिवशक्ती क्रीडा मंडळ या संघाचा अतिशय चुरशीच्या सामन्यात 41-37 असा 4 गुणांनी प्रभाव करून अंतिम विजेतेपद संपादित केले. सदर सामन्यात शिवशक्ती क्रीडा मंडळ या संघाने ओलीसुकी जिंकून क्रीडांगणाची निवड केली. सामन्यातील पहिली चढाई शिवतेज क्रीडा मंडळ संघाच्या माधुरी गवंडी हिने केली.   तर, शिवशक्ती क्रीडा मंडळ संघाकडून प्रथम  चढाई सुरेखा कदम हिने केली.
स्पर्धेतील सर्वोत्कुष्ट खेळाडू : माधुरी गवंडी शिवतेज क्रीडा मंडळ, ठाणे)
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पक्कडपट्टू  : तेजश्री सुंबे (शिवतेज क्रीडा मंडळ, ठाणे)
(अंतिम) दिवसाचा उत्कुष्ट चढाईपट्टू म्हणून शिवतेज क्रीडा मंडळाच्या निकिता कदम हिला पारितोषिक मिळाले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading