​वाशीमध्ये १ ते ३ जून दरम्यान महाइंडेक्स २०२३ औद्योगिक प्रदर्शन

महाइंडेक्स २०२३ हे औद्योगिक प्रदर्शन   सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी, येथे 1ते3 जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्सचे अध्यक्ष संदीप पारीख, राष्ट्रीय कोसिआचे मानद महासचिव निनाद जयवंत, टिसाच्या अध्यक्ष  सुजाता सोपारकर यांनी दिली. चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स आणि महाराष्ट्रातील सुमारे ३५ औद्योगिक संघटना प्रथमच एका छताखाली नेटवर्कसाठी एकत्र येणार असल्याने हे महाराष्ट्रातील पहिले मेगा इंडस्ट्रियल एक्स्पो आहे.
MahaindX मध्ये लघुउद्योगांना त्यांची उत्पादने प्रदर्शित  करता येतील .तसेच त्यांची  काम करण्याची क्षमता प्रदर्शित करता येईल.  संभाव्य ग्राहकांशी नेटवर्क करण्यास आणि नवीन व्यवसाय संधी शोधण्यासाठी एक वेगळे महत्त्वाचे व्यासपीठ कोसिआ मार्फत उपलब्ध होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होण्याच्या दृष्टीने केंद्राच्या इंडस्ट्री 4.0 ह्या थीमसह,   MahaindX  मध्ये इंटरनेट ऑफ थिंग  ,  आर्टिफिसल इंटेलिजन्स , क्लाउड कॉम्प्युटिंग, 3D प्रिंटिंग आणि रोबोटिक्स सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक त्यात असेल.
ह्या एक्स्पो मध्ये अभियांत्रिकी आणि त्यासंलग्न उद्योगांसाठी संभाव्य खरेदीदार आणि पुरवठादारांशी संपर्क साधण्यासाठी B2B मॅच मेकिंगच्या संधी ह्या औद्योगिक प्रदर्शनातुन उपलब्ध होतील.काही देशांचे दूत आणि वाणिज्य अधिकारी तसेच जर्मनी, इंडोनेशिया, फ्रांस, कोरिया, मॉरिशस तसेच अनेक देशांचे प्रतिनिधी आणि कंपन्या सहभागी होणार आहेत. या 3 दिवसीय मेगा एक्स्पोमध्ये अभियांत्रिकी आणि केमिकल क्षेत्रातील  सुमारे 200पेक्षा अधिक स्टॉल्स असतील आणि 20,000पेक्षा अधिक उद्योजक/व्यावसायिक भेट देतील असा अंदाज आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading