मालवण येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या आयुषी आखाडेला सुवर्णपदक

मालवण येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या आयुषी आखाडेनं सुवर्णपदक पटकावले. सिंधुदुर्ग जिल्हा हौशी जलतरण संघटना आणि मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणच्या चिवला बीचवर आयोजित राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी बक्षीसांची लयलूट केली. तसंच 2 कि.मी. स्पर्धेत आयुषी आखाडे हिने मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक प्राप्त केले. 500 मीटर स्पर्धेत माही जांभळे हिने दुसरा क्रमांक प्राप्त करीत रौप्यपदक तर नायर कौशल हिने तिसरा क्रमांक पटकावित कांस्यपदक पटकाविले. तर ओजस मोरे याने पाचवा क्रमांक पटकाविला.
1 कि.मी स्पर्धेत फ्रेया शहा हिने चौथा क्रमांक पटकाविला तर युवराज राव, तृणांश गंद्रे, वरद कोळी, श्रृती जांभळी, किमया गायकवाड यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.
2 कि.मी स्पर्धेत परीन पाटील याने द्वितीय क्रमांक पटकावित रौप्यपदक प्राप्त केले तर सोहम पाटील याने ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.
3 कि.मी स्पर्धेत स्नेहा लोकरे हिने सातवा क्रमांक आणि सोहम साळुंखे याने दहावा क्रमांक पटकाविला. तर प्रशांत साळुंखे यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.
5 कि.मी स्पर्धेत मानव मोरेने पाचवा क्रमांक तर श्रवण पेठे यांनी दहावा क्रमांक प्राप्त केला. हे सर्व जलतरणपटू मारोतराव शिंदे तरण तलाव येथे प्रशिक्षक अतुल पुरंदरे, कैलास आखाडे, रुपेश घाग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading