मालमत्ता आणि पाणीपटटी कर भरणा सवलत योजनेस २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

मालमत्ता आणि पाणीपटटी कर भरणा सवलत योजनेस आता २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने 2020-21 या आर्थिक वर्षात जे निवासी करदाते आपला थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित जमा करतील त्यांच्या थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या शास्तीच्या रकमेवर 100 टक्के सवलतीची योजना १ ते ३१ जानेवारी या कालावधीत सुरू केली होती, या कालावधीत करदात्यांचा मिळालेला उत्सफूर्त प्रतिसाद विचारात घेवून या योजनेस २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. करदात्यांसाठी ही योजना १ ते २८ फेब्रुवारी या कालावधीकरिता कार्यान्वित असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कराची थकबाकी असल्यास संपूर्ण थकबाकी, संपूर्ण चालू मागणी आणि सूट नंतरची देय शास्ती (दंड / व्याज) ची रक्कम उपरोक्त मुदतीमध्ये एकत्रित जमा करणे अनिवार्य आहे. ज्या करदात्याने मालमत्ता कराची आणि पाणीपट्टीची संपूर्ण रक्कम शास्तीसह या योजनेपूर्वी जमा केली असेल त्यांना ही सूट देय असणार नाही. ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्याकरिता देयके महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसंच सर्व प्रभाग आणि उपप्रभाग स्तरावील कर संकलन केंद्र २८ फेब्रुवारी पर्यंत सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 पर्यंत तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आणि सर्व शनिवारी सकाळी 10.30 ते सायंकाळी 4 या वेळेत सुरू राहतील. तसेच DigiThane या ॲपद्वारे मालमत्ता कराचा भरणा केल्यास DigiThane ॲपद्वारे मिळणारी सूटही मिळू शकेल. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading