मानपाडा येथील प्लायवूड आणि केक शॉपला आग

मानपाडा येथील प्लायवूड आणि केक शॉपला आग लागण्याची घटना आज सकाळी १० च्या सुमारास घडली. मानपाडा ब्रीजसमोर साई किरण रेस्टॉरंट समोर ही दुकानं आहेत. आज सकाळच्या सुमारास या दुकानात आग लागल्याची माहिती मिळताच महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. या ठिकाणी मिलिंद चौहान यांचे सुफले केक शॉप आणि जिनेश जैन यांचे प्लायवूड शॉप असून या दुकानांना आग लागली होती. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी २ तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading