मानकोली ब्रिज ते साया रिसॉर्ट मुख्य रस्त्यावर 13 जुलै रोजी नो पार्किंग

भिवंडीमधील अंजूर येथील साया रिसॉर्ट येथे १३ जुलै २०२३ रोजी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रशिक्षण वर्ग (राज्य स्तरीय) होणार आहे. यामुळे मानकोली पूल ते साया रिसॉर्ट रस्ता हा मार्गावर दोन्ही बाजूस सकाळी 6.00 ते रात्री 22.00 वाजेपर्यंत वाहने लावण्यास (नो पार्किंग) प्रतिबंध करण्यात आला असल्याची माहिती ठाणे शहर वाहतुक विभाग, पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

      उद्या, दि. १३ जुलै रोजी अंजूर येथील साया रिसॉर्ट या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील व महाराष्ट्रातील खासदार व आमदार तसेच राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी जनसमुदाय जमा होण्याची शक्यता आहे. मानकोली चौक ते साया रिसॉर्ट रस्ता अरुंद असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी दि. 13 जुलै 2023 रोजी सकाळी 06.00 ते रात्री 22.00 वाजेपर्यंत मानकोली ब्रिज ते साया रिसॉर्ट मुख्य रस्त्याचे दोन्ही बाजुस 3 किमी अंतरापर्यंत वाहने लावण्यास (नो पार्किंग) मनाई करण्यात आली आहे.

         ही वाहतुक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही,  असे उपआयुक्त डॉ. राठोड यांनी कळविले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading