एका उभ्या असलेल्या कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू

एका उभ्या असलेल्या कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. पूजा सावंत या निळकंठ हाईटस् येथे राहणा-या महिलेचा कार चालक दिवाकर शर्मा हा मद्य घेऊन कार चालवत असल्याचं उघड झालं. शास्त्रीनगर येथून त्या घरी जात होत्या. त्याचवेळी शर्मा याने उभ्या असलेल्या मोटारीला धडक दिली. या दोन्ही कारमध्ये पूजा अडकल्या आणि गंभीर जखमी झाल्या. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीसांनी कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading