मातीची गणेश मू्र्ती वर्षभर घरात ठेवणं योग्य नाही – दा. कृ. सोमण

मातीची गणेश मूर्ती वर्षभर घरात ठेवणं योग्य नसल्याचं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं आहे. राज्य सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवासंबंधी नियमांचं एक पत्रक काढलं असून त्यामध्ये गणेशोत्सवासाठीचे काही नियम सांगितले आहेत. या परिपत्रकातील बाकीचे नियम योग्य असले तरी मातीची गणेशमूर्ती वर्षभर घरात ठेवून तिचे पुढच्या वर्षी विसर्जन करावे असं जे म्हटलं आहे ते चुकीचं असल्याचं सोमण यांनी म्हटलं आहे. मातीची गणेशमूर्ती वर्षभर घरात ठेवली तर वातावरणातील तापमानात होणा-या बदलामुळे मूर्तीस तडा जाऊ शकतो. त्यामुळे हे योग्य नसून त्यावर उपाय म्हणून लहान मूर्ती आणून घरातच योग्य दिवशी बादलीतील स्वच्छ पाण्यात विसर्जन करावी असं सोमण यांनी सांगितलं आहे. परंतु मातीची मूर्ती वर्षभर घरात ठेवा असं सांगणं चुकीचं असल्याचं दा. कृ. सोमण यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading