जिल्ह्यात सद्यस्थितीत २१ हजार ८२० कोरोना ग्रस्त

जिल्ह्यात सद्यस्थितीत २१ हजार ८२० कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत १ हजार ५६० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २९ हजार ७७२ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण ५३ हजार १५२ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ५ हजार ३८५ रूग्ण उपचार घेत असून ७ हजार ४१ कोरोना रूग्ण बरे झाले तर ४९९ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ५ हजार ६८१ रूग्ण उपचार घेत असून ६ हजार २९० बरे झाले तर १८१ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३ हजार ३८८ रूग्ण असून ५ हजार ४५२ बरे झाले तर २९२ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार ४६५ रूग्ण उपचार घेत असून ३ हजार ८०२ कोरोनातून बरे झाले तर १८२ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये १ हजार ७९७ रूग्ण असून २ हजार ५४ बरे झाले तर ६३ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये १ हजार ७४ रूग्ण उपचार घेत असून १ हजार ४८३ कोरोनातून बरे झाले तर १४४ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ४८८ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून १ हजार ९८९ बरे झाले तर ९७ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये ७३६ रूग्ण असून ५९६ कोरोनामुक्त झाले तर २० जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार ८०६ रूग्ण असून १ हजार ६५ बरे झाले तर ८२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading