माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापकता वाढण्याचे आयुक्तांचे निर्देश

ठाणे शहरात सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ या मोहिमेची व्यापकता वाढविण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी अधिकऱ्यांना दिले. दरम्यान या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्याच्या स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी आज उपआयुक्त, शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्या अधिका-यांची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत ते बोलत होते. कोरोना विरूद्धच्या लढाईमध्ये महत्वाची मोहिम म्हणून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. ठाणे शहरामध्ये ही मोहिम अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येत असून या मोहिमेची व्यापकता वाढविण्याच्या सूचना या बैठकीत आयुक्तांनी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading