जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार २५९ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार २५९ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ३० जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत १७ हजार ११७ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ४ हजार ४२६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ५१ हजार ५३१ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण १ लाख ७३ हजार ७४ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ३ हजार ६३१ रूग्ण उपचार घेत असून ३१ हजार ६९२ कोरोना रूग्ण बरे झाले तर ९९० जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ३ हजार ८८१ रूग्ण उपचार घेत असून ३७ हजार २४९ बरे झाले तर ८२१ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३ हजार ४८७ रूग्ण असून ३२ हजार २४ बरे झाले तर ७४६ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार ९०७ रूग्ण उपचार घेत असून १५ हजार ७३९ कोरोनातून बरे झाले तर ५६१ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ६८० रूग्ण असून ८ हजार १५८ बरे झाले तर २९६ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये २८४ रूग्ण उपचार घेत असून ४ हजार ४०३ कोरोनातून बरे झाले तर ३०६ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ४०४ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ५ हजार ५७२ बरे झाले तर २२६ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये ४२७ रूग्ण असून ५ हजार ५५९ कोरोनामुक्त झाले तर ७७ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये २ हजार ४१६ रूग्ण असून ११ हजार १३५ बरे झाले तर ४०३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading