माझी वसुंधरा अभियानाबाबत शहरात जनजागृती

वृक्षाची लागवड करुन वृक्ष संवर्धन करा, प्लॅस्टिकचा वापर टाळा, इंधनरहित वाहनांचा (सायकल) वापरा करा अशी जनजागृती माझी वसुंधरा अभियानांतर्गत ठाणे महापालिकेमार्फत व्हॅनवर एल.ई.डी स्क्रीन लावून त्या माध्यमातून शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाद्वारे राज्य पातळीवर आयोजित माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये ठाणे महापालिका सहभागी झाली आहे. या अभियानाबाबत महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना माहिती देण्याकरिता तसेच या अभियानाचे स्वरुप आणि त्याची उपयुक्तता ठाणेकरांना व्हावी यासाठी शहरात जनजागृती करण्यात येत आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालये, गृहसंकुले, मॉल्स, बाजारपेठा, चौक आणि शहरातील सार्वजनिक ठिकाणी एल.ई.डी व्हॅन उभी करुन त्यावरील स्क्रिनवर माझी वसुंधरा अभियानातंर्गत महापालिकेद्वारे तयार करण्यात आलेली ध्वनीफित विद्यार्थी आणि पालकांना दाखविण्यात आली. या ध्वनीफितीच्या माध्यमातून मुख्यत: ठाणे महापालिकेच्या सर्व विभागांद्वारे पर्यावरण संवर्धानासाठी केलेली कामे आणि प्रकल्पाबाबतची माहिती काव्य स्वरुपात दाखविण्यात येत आहे. तरी नागरिकांनी माझी वसुंधरा 3.0 या अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन राखण्याकामी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading