कळव्यातील मनिषानगर येथील एका सोसायटीत दुपारच्या सुमारास आग

कळव्यातील मनिषानगर येथील एका सोसायटीत आज दुपारच्या सुमारास आग लागली होती. आज दुपारी दीड च्या सुमारास मनिषा नगर २ मधील शारदा सोसायटीतील वास्तूशिल्प बिल्डर्स या तळमजल्यावर असलेल्या ऑफीसमध्ये आग लागल्याची तक्रार आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आली होती. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दल यांनी तातडीनं धाव घेऊन ही आग नियंत्रणात आणली. या आगीत २ एसी युनिट, टेबल, ३ कॉम्प्युटर आणि कागदपत्रं जळून खाक झाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading