माजिवड्यातील एका चाळीच्या गॅलरीचा काही भाग पडल्यामुळे चार रहिवाशांचं स्थलांतर

माजिवड्यातील एका चाळीच्या गॅलरीचा काही भाग पडल्यामुळे चार रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. माजिवड्यातील सिध्दार्थनगर येथे साईकृपा चाळ आहे. या चाळीचे मालक रामचंद्र यादव असून ही तळ अधिक एक मजली चाळ सुमारे ५० वर्ष जुनी आहे. या चाळीच्या गॅलरीचा १० ते १५ फूट लांबीचा भाग पडला असून या चाळीचा जिन्याचा भागही धोकादायक अवस्थेत होते. या घटनेची माहिती कळताच आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल तसंच पालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी धाव घेतली. चाळीच्या जिन्याचा धोकादायक भाग तोडून बाजूला करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या चाळीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश प्रभाग समितीने दिले आहेत. चाळीचा उर्वरीत भागही धोकादायक स्थितीत असल्यामुळे या ठिकाणी धोकापट्टी बांधण्यात आली आहे. तसंच चाळीतील तळ आणि पहिल्या मजल्यावर राहणा-या सात कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading