​माजिवडा येथील आशर प्लस कंस्ट्रक्शन प्लांट मधील लेबर रूमला आग

माजिवडा येथील आशर प्लस कंस्ट्रक्शन प्लांट मधील लेबर रूमला आग लागण्याचा प्रकार काल रात्री घडला. माजिवडा येथील आशार प्लस कन्ट्रक्शन प्लांट मधील पत्र्याच्या तात्पुरत्या स्वरूपात बनविण्यात आलेल्या १८ लेबर रूम पैकी ४ पत्र्याच्या लेबर रूमला आग लागली होती. हे वृत्त कळताच  घटनास्थळी महावितरण कर्मचारी, कापूरबावडी पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं.  या घटनेत एका कामगाराला किरकोळ दुखापत झाली असून त्याल जवळील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. घटनास्थळी लेबर रूम मध्ये ४ छोटे डोमेस्टिक सिलेंडर होते, त्या पैकी एका सिलेंडरचा स्फोट झाला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading