माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. या कारवाईतंर्गत माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील वाघबिळ गांव स्टील्ट + ५ मजली अनधिकृत इमारतवरील मालदा साफ करण्याचे काम सुरू आहे. भाईंदरपाडा येथील नाईट क्वीन (खुशी) या अनधिकृत लेडीज बारचे बांधकाम पूर्णपणे निष्कसित करण्यात आले. ओवळा येथील स्टर्लिंग या अनधिकृत लेडीज बारचे बांधकाम पूर्णपणे निष्कसित करण्यात आले. तसेच ढोकळी येथील डिमार्ट च्या बाजूला चालू असलेले बैठी बांधकाम पूर्णपणे निष्कासित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading