कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज कळवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. या कारवाईतंर्गत कळवा प्रभाग समितीमधील आझाद चौक खारेगाव येथील अमृत पार्क या तळ + ९ मजली अनधिकृत इमारतीच्या रुमच्या भिंती आणि दरवाजे निष्कासित करण्यात आल्या. कळव्यातील ओम मयुरेश सोसायटी या तळ + ८ मजली अनधिकृत इमारतीच्या ११ रुमच्या अंतर्गत भिंती निष्कासित करण्यात आल्या. कळवा मार्केट ते स्टेशन रोड येथील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading