माउंट एव्हरेस्ट मोहीमेसाठी ठाणे- रायगडचे चौघे सज्ज ; मुख्यमंत्र्यांनी भारतीय ध्वज देत दिल्या मोहिमेस शुभेच्छा

भारतीय रेल्वे सेवेत काम करणारे आणि ठाण्याचे सुपुत्र असलेले हेमंत जाधव,संदीप मोकाशी आणि बँकेत काम करणारे धनाजी जाधव यांच्यासह रायगड जिल्ह्यातील कर्जतचे संतोष दगडे असा चार जणांचा चमू १ एप्रिलपासून माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी आगेकूच करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या चमूला भारतीय ध्वज देऊन मोहिम यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या मोहिमेमुळे निश्चितच जिल्ह्यासह रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. दरम्यान या मोहिमांमागे छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमीच प्रेरणादायी असे सांगताना, हा चमू १ एप्रिल ते २७ मे २०२३ दरम्यान आता जगातील सर्वात ८८४८.८६ मीटर उंच असेलेले (29031 फूट) चढण्यासाठी सज्ज आहेत.
या मोहिमेचे प्रमुख असलेले बदलापूरचे हेमंत जाधव हे मध्य रेल्वेत अभियांत्रिकी विभागात कार्यरत तर डोंबिवलीचे संदीप मोकाशी ही मध्य रेल्वेमध्ये इलेक्ट्रिकल विभागात कार्यरत आहेत. तर कर्जतचे रहिवासी असलेले संतोष दगडे हे व्यावसायिक असून ठाण्यातील माजीवडा येथील रहिवासी असलेले धनाजी जाधव हे बँकेत कार्यरत आहे. हा चमू सर्व या साहसी क्षेत्रात ३० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले अनुभवी गिर्यारोहक आहेत आणि त्यांनी NIM, HMI येथून त्यांनी मूलभूत, प्रगत व शोध आणि बचाव क्रम अभ्यासक्रमासह व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे. या कौशल्यांचा आणि ज्ञानाचा उपयोग माउंटन रेस्क्यू ऑपरेशनसारख्या सामाजिक सेवांसाठी आणि तरुणांमध्ये पर्यावरणाविषयी सकारात्मक विचार विकसित करण्यासाठी केला जातो. अनेक विद्यार्थी, मित्र आणि नातेवाईक यांना निसर्गाशी जोडण्यासाठी ते प्रेरणादायी आहेत. कोविड-19 दरम्यान ते व बाकी टीम सदस्यांनी काही दुर्गम भागातील लोकांना आवश्यक अन्न पुरवले जसे की काही किल्ल्यांच्या पायथ्याशी/वाडी/वस्ती जेथे योग्य रस्ते उपलब्ध नाहीत तेथे. त्यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये कारगिलमधील तांत्रिक आणि अवघड असलेले ७ हजार १३५ मीटर उंच माउंटनून शिखर यशस्वीरित्या चढले आहेत. त्याशिवाय त्यांनी १२ हून अधिक ६ हजार मीटर वरील हिमालयीन शिखरे सर केली अशी माहिती हेमंत जाधव यांनी दिली.
हा चमू १ एप्रिल रोजी मुंबईतुन एव्हरेस्ट मोहिमेसाठी काठमांडू नेपाळला येथे रवाना होत आहे. गुरुवारी रात्री त्या चमूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर अंबे माते च्या दरबारात माउंट एव्हरेस्ट मोहीम-२०२३ ला भारताचा ध्वज सुपूर्त करुन मोहीम यशस्वी करुन येण्यासाठी शुभेच्छा दिल्याचे ही जाधव यांनी सांगितले.
* दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन
ही मोहीम खर्चिक आहे. यासाठी प्रत्येकी ३० लाख रुपये इतका खर्च आहे. त्यानुसार पीएफ तसेच लोण घेऊन हा चमू निघाला आहे. जवळपास त्यांनी प्रत्येकीने १५ लाखांची जमा केले असून उर्वरित निधीचीही जमावाजमाव सुरू आहे. त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळीही प्रयत्नशील आहे. याशिवाय या मोहिमेसाठी त्यांनी दानशूर व्यक्तींना शक्य तितकी मदत करण्याचे आवाहन ही केले आहे. या मदतीसाठी 9833558128 या नंबरवर संपर्क करून सहकार्य करा असे त्या चौघांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading