कल्याण मध्ये तृतीय पंथीयांसाठीसाठी पहिले अद्ययावत सलून सुरू

कल्याण मध्ये तृतीय पंथीयांसाठीसाठी पहिले अद्ययावत सलून सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात जवळपास १५०० ते १६०० तृतीय पंथीय राहत असून भिक मागून किंवा शरीर विक्रीचा व्यवसाय करत हे तृतीय पंथीय आपली उपजीविका करतात. मात्र त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी मागील २५ वर्षापासून किन्नर अस्मिता असोसीएशन काम करते. या संस्थेकडून तृतीय पंथीयासाठी शेल्टर होम सुरु करण्यात आले असून कम्युनिटी किचनच्या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तृतीय पंथीयाना ब्युटी पार्लर मध्ये मिळणारी अपमानकारक वागणूक, त्यांना ग्राहक असताना न दिला जाणारा प्रवेश यासारख्या भेदभावामुळे दुखावलेल्या तृतीय पंथीयासाठी हक्काचे ब्युटी पार्लर असावे या उद्देशाने हे पार्लर सुरु करण्यात आले असून किन्नर अस्मिता असोसीएशनने युएसएआयडीच्या आर्थिक मदतीतून खडकपाडा परिसरात तृतीय पंथीयासाठी पहिले अद्ययावत पार्लर सुरु केले असून या सलूनचे उघाटन अमेरिकेचे महावानिज्यदूत माईक हॅन्की आणि युएसएआयडीच्या उप मिशन डायरेक्टर कॅरेन क्लीमोव्स्की यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय तृतीय पंथीय दिवसाचे औचित्य साधून करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading