महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या सरचिटणीस सुमन अग्रवाल यांच्यातर्फे सिव्हील रुग्णालयाला दोन हॉट वॉटर डिस्पेन्सर मशिन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या सरचिटणीस सुमन अग्रवाल यांनी सिव्हील रुग्णालयाला दोन हॉट वॉटर डिस्पेन्सर मशिन सुपूर्द केल्या. कोव्हीड १९च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजी घेण्याचे आवाहन केलं जात आहे. सातत्याने गरम पाण्याचे सेवन करून काळजी घेतल्यास या महामारीवर मात करणे शक्य होणार असल्याने अग्रवाल यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना पत्र पाठवून राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये “हॉट वॉटर डिस्पेन्सर मशीन” बसवण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर खारीचा वाटा म्हणुन सुप्रयास फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सुमन अग्रवाल यांनी सिव्हील रुग्णालयाला दोन हॉट वॉटर डिस्पेन्सर मशिन सुपूर्द केली. त्याचबरोबर, रूग्णालयासाठी लागणारे मास्क, सॅनिटायझर आणि जंतुनाशके पुरवण्याचे आश्वासन दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading