महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला होता. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. शहर काँग्रेस कार्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला. मोर्चेक-यांनी यावेळी जिल्हाधिका-यांना एक निवेदन दिलं. त्यानंतर एनकेटी सभागृहात एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.