महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना टोलच्या विरोधात आंदोलन करण्या प्रकरणी पोलिसांनी घेतल ताब्यात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना टोलच्या विरोधात आंदोलन करण्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतल. मनसे नेते अविनाश जाधव हे टोल नाक्यावरती लोकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोल माफ असलेला व्हिडिओ दाखवत लोकांना सांगत आहे की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की टोल माफ झाले. तुम्ही टोल भरू नका अशा प्रकारे कालचा व्हिडिओ देवेंद्र फडणवीस दाखवून लोकांमध्ये जनजागृती करतात आणि लोकांना आव्हान करता की टोल भरू नका मात्र काही लोकांनी त्या गाडीवरती फास्टट्रॅक लावल्यामुळे त्याचा टोल कट होतो आहे. मग इतके दिवस नागरिक टोल भरत होते ही लोकांची फसवणूक नाही का असाही आरोप नागरिकांनी केला आहे. आपण आपला मूलभूत हक्क बजावत असून या आंदोलनाला चूक काय आहे हे पोलिसांनी दाखवाव असं जाधव यांच म्हणणं होतं, मात्र पोलिसांना यावर काहीच उत्तर देता आलं नाही. पोलिसांनी आंदोलन करताना अविनाश जाधव यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना ही ताब्यात घेतलं.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading