ढोलकीपटू तेजस मोरे याच्या रिदम म्युझिक अकॅडमीचे उदघाटन मुंबई विद्यापीठाच्या शैला खांडगे यांच्या हस्ते

ठाणे शहरातील पाचपांखाडी भागात ठाण्यातील सुप्रसिद्ध ढोलकीपटू तेजस मोरे याच्या रिदम म्युझिक अकॅडमीचे उदघाटन मुंबई विद्यापीठाच्या शैला खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक नारायण पवार, ठामपा परिवहन सदस्य राजेश मोरे यांच्यासह अनेक मान्यवरानी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
लहानपणापासून तबला आणि ढोलकीमध्ये यशस्वी झालेला तेजस मोरे या तरुणाने रिऍलिटी शो च्या मागे न धावता नव्या पिढीसाठी ही म्युझिक अकॅडमी सुरू केली आहे. त्याच्याकडून नवीन कलाकार घडतील अशा शुभेच्छा शैलाखांडगे यांनी दिल्या. यावेळी गायक सौजस मोरे याचेही मान्यवरानी कौतुक केले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading