नथुराम गोडसे बोलतोय” नाटकाचा प्रयोग गडकरी रंगायतनमध्ये प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीत निर्विघ्न पार

धर्मवीर आनंद दिघे विचार आणि सेवा मंच तर्फे ठाण्यात आयोजित केलेला “नथुराम गोडसे बोलतोय” नाटकाचा प्रयोग गडकरी रंगायतनमध्ये प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीत निर्विघ्न पार पडला. नथुराम साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे यांच्या यापुर्वीच्या नाटकाचे ८१७ प्रयोग झाले असले तरी, त्यावेळी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या बगलबच्चाच्या मोठ्या विरोधाचा सामना नाट्य निर्माते तसेच रसिकांना करावा लागला होता.मात्र, नौपाडा पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केल्याने एकही विरोधक नाट्यगृहाकडे फिरकले नाहीत. नथुराम गोडसे यांच्यावरील या नाटकाच्या नावावरून आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या “नथुराम गोडसे बोलतोय” या नाटकाचे ५० प्रयोग महाराष्ट्रात होणार आहेत. भाजप शहर उपाध्यक्ष तथा स्वामी फाउंडेशनचे संस्थापक महेश कदम आणि धर्मवीर आनंद दिघे विचार आणि सेवा मंचचे जयदीप कोर्डे यांच्या सहकार्यातुन शुभारंभाचा प्रयोग ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये झाला. या नाटकाला रसिक विशेषत: तरुणाईने विशेष उपस्थिती दर्शविल्याचे दिसुन आले. दरम्यान, ठाण्यात होणार असलेल्या नथुराम गोडसे बोलतोय नाटकावरून राजकिय विरोध होण्याच्या शक्यतेने नौपाड पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.नथुराम गोडसे यांच्यावरील या नाटकाला यापूर्वी बराच विरोध झाला होता. त्याकाळात धर्मवीर आनंद दिघे या नाट्यकृतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. आताही त्याच आनंद दिघे यांच्या ठाण्यात पहिला प्रयोग निर्विघ्न पार पडल्याचे जयदीप कोर्डे यांनी सांगितले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading